कासारवाडीत पिस्‍तुलासह तरुणास अटक

पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – देशी बनावटीचे पिस्‍तुल घेऊन फिरणा-या एका तरुणाला गुंडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई कासारवाडी येथे गुूरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी रात्री आठ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
सलीम नजिर पटेल (वय २५, रा. कासारवाडी) असे अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस अंमलदार तौसिफ ईलाही शेख यांनी शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी दापोडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, पोलीस सह आयुक्तांनी १५ ते २८ एप्रिल २०२६ या कालावधीत शस्त्रबंदीचे आदेश लागू केले आहेत. या आदेशाचा भंग करून आरोपी सलीम पटेल याने एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस स्‍वतःजवळ बाळगले. जप्त करण्यात आले आहे. हे पिस्‍तुल त्‍याने कशासाठी आणि कोणाकडून आणले याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *