निघोजेमध्‍ये गावठी कट्टा बाळगणारा तरुण ताब्यात

पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – एका तरुणाला विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत पुजा हॉटेलजवळ करण्‍यात आली.
शेखर पोपट तांबे (वय २३, रा. सध्या तांबेवाडी, वरुडे, ता. खेड, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. पोलीस शिपाई प्रशांत जयंत कसबे यांनी दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडे २५ हजार ५०० रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि पितळी जिवंत काडतूस आढळून आले. आरोपीने पोलीस आयुक्तांच्या लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले आहे. दक्षिण म्हाळुंगे पोलीस अधिक तपास करीत आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *