Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

विषारी दारूकांडाचा तपासाकरिता सीआयडीची १० विशेष पथके मैदानात, मेथेनॉल पुरवठ्याचे धागेदोरे उलगडले

By Team News Beez
June 3, 2026 1 Min Read
0

एफएसएल अहवाल आणि मोबाईल विश्लेषणावर भर

पुणे –
दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारूकांडानंतर राज्य यंत्रणा पूर्णपणे अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. अनेकांचा बळी गेलेल्या या गंभीर प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला असून, गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सीआयडीने तब्बल १० विशेष पथके नियुक्त केली आहेत. या तपासादरम्यान विषारी मेथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीचा उलगडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

सीआयडीने तपासाची व्याप्ती वाढवत विविध जिल्ह्यांतील धागेदोरे जोडण्यास सुरुवात केली आहे. दापोडी प्रकरणातील सर्व सहा आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची सीआयडीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ठाण्यातील नारपोली पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला असून, त्या गुन्ह्यातील आरोपींनाही सीआयडी तपासात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सीआयडीकडून घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, जप्त केलेल्या दारूचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे तपासले जात आहेत. नमुने पुण्यातील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळीची छाननी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, एफडीए आणि सीआयडी यांच्यात समन्वय ठेवून पुराव्यांची मजबूत साखळी उभारली जात आहे.

दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाबाबत नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास ती तपास यंत्रणेला देण्याचे आवाहन सीआयडीकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील प्रत्येक दुवा तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

वायसीएम शवागृहातील कोल्ड स्टोरेजमध्ये बिघाड; दुर्गंधीमुळे कर्मचारी व नातेवाईक त्रस्त ६३ मृतदेह क्षमतेच्या शवागृहातील एका यंत्रणेचे तापमान ९ अंशांच्या पुढे; प्रशासनाकडे तातडीच्या दुरुस्तीची मागणी

Next

खराब हवामानाचा विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता; प्रवाशांना वेळेपूर्वी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
  • Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश
  • Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत
  • *सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

CATEGORIES

  • Uncategorized (445)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
  • Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

*सरकारच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले; जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी घेतली भेट*

Team News Beez

नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी मंगळवारी उशिरा रात्री आपले उपोषण मागे घेतले....

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mawal-पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा*

Sumedh Chapalgaonkar

पवनानगर, दि. २४-*पवना धरणातून आज सकाळी ९ वाजता विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा* *धरण ९५...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme