पिस्तूलासह तरुणास अटक

​परी, दि. ४ (प्रतिनिधी) – पोलीस आयुक्तांच्या शस्त्रबंदी आदेशाचा भंग करून बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई रावेत येथील राजयोग कॉलनी रोडवर शुक्रवारी मध्‍यरात्री पावणे एक वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली आहे.
नितीन पांडुरंग घवाळे (वय ३१, रा. रमाबाईनगर, रावेत) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विनायक सुभाष मराठे (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना आरोपीने त्याचा भंग केला. त्याच्याकडून ५०,००0 रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि.एक हजार रुपये किमतीचे १ जिवंत काडतूस विनापरवाना बाळगल्याप्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे. पुढील तपास रावेत पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *