पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – गस्त घालत असताना पोलिसांनी एका तरुणाकडून विनापरवाना पिस्तूल जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुणाल रेसिडेन्सीच्या पाठीमागे पवार इस्टेट येथील कच्च्या रस्त्यावर थेरगाव येथे करण्यात आली.
रोहित दिनेश शिंदे (वय १८, रा. रमाबाई नगर, भाटनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार स्वप्नील खेतले यांनी मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या कब्जात २७ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले. या शस्त्रावर केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे निर्मात्याचे नाव किंवा कोणताही ओळख क्रमांक नव्हता. आरोपीने हे पिस्तूल बेकायदेशीरपणे बाळगले असल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
थेरगावमध्ये बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई
