टास्कच्या नावाखाली महिलेची 24 लाखांची फसवणूक

पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून वाकड येथील गृहिणीची 24 लाख 28 हजार 987 रुपयांची फसवणूक केली. ही घटना कस्पटे वस्ती परिसरात 30 ऑक्टोबर 2025 ते 3 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडली.
शमिका, लायला शर्मा आणि रजत बाळाकृष्णन (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहीन अफरोज (वय 47, रा. अनमोन रेसिडेन्सी, काळेवाडी फाटा, वाकड) यांनी बुधवारी (दि. 22 एप्रिल) रोजी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एच. आर. मेगा इंडिया लिमिटेड कडून पैसे कमवण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यानंतर टेलिग्रामवर आरोपींनी त्यांना विविध टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली मोठी रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. फिर्यादीने विश्वास ठेवून वेळोवेळी एकूण 24 लाख 28 हजार 987 रुपये विविध बँक खात्यांवर पाठवले. जेव्हा आरोपींनी आणखी 23 लाख रुपयांची मागणी केली, तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस ठाण्यातील निरीक्षक पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *