तळवडे परिसरात क्रेन कोसळल्याने वीज पुरवठा खंडित; ८ हजारहून अधिक ग्राहकांना फटका

पुणे, दि. 23 एप्रिल, 2026- तळवडे येथील जोतिबा मंदिरासमोर गुरुवारी सकाळी (11.30) वाजेच्या सुमारास एक मोठी क्रेन रोहित्रावर कोसळल्याने वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले आहे. ही क्रेन २२ केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनला येणाऱ्या वाहिनीवर पडल्याने या 8610 ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झालेला आहे.

22 केव्ही देवी इंद्रायणी स्विचिंग स्टेशनमधून देहूगाव व तळवडे या 22 केव्ही वाहिन्या बाहेर पडतात. या वाहिनीवर 1910 औद्योगिक आणि 6700 घरगुती ग्राहक आहेत. या सर्वांना या बिघाडाचा फटका बसला आहे. क्रेनने एक रोहित्र व काही खांब जमीनदोस्त केले आहे.

संबंधित क्रेन मालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. सोबतच महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, तुटलेले खांब आणि तारा बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे. संध्याकाळी 6.30 पर्यंत हा बिघाड दुरुस्त करुन वीजपुरवठा सुरळीत केला जाईल असे महावितरणचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *