निगडीत ​तडीपार गुंडाला कोयत्‍यासह अटक

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी तडीपार केलेला असतानाही शहरात विनापरवाना प्रवेश करून हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्‍या सुमारास ट्रान्‍सपोर्टनगर, निगडी येथे करण्‍यात आली आहे.
​याप्रकरणी पोलीस अंमलदार विकास रेड्डी यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी निगडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. आयुब चमन खान (वय २८, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, ओटास्‍कीम, निगडी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आयुब खान याला २८ नोव्हेंबर २०२५ मध्ये पोलीस उपायुक्‍त यांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याने शासन किंवा पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता आदेशाचा भंग करून निगडीतील ट्रान्सपोर्ट नगर भागात हातात कोयता घेऊन वावरत असताना मिळून आला. पोलिसांनी त्याला पकडून त्‍याची झडती घेतली असता त्‍याच्‍याकडे २०० रुपयांचा कोयता आढळून आला. निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *