गांजा विक्री प्रकरणी अल्‍पवयीन मुलगा ताब्‍यात

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ गांजा विक्रीसाठी आलेल्या एका अल्‍पवयीन बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्‍याच्‍याकडून विक्रीसाठी आणलेला गांजा हस्‍तगत केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री सव्‍वानऊ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
​याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल बाबाजी डेरे यांनी गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अल्‍पवयीन मुलाच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार गुरुवारी रात्री अल्‍पवयीन मुलाकडून पोलिसांनी ८५० ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याची किंमत ४० हजार रुपये इतकी आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छी मार्केट परिसरात हा मुलगा गांजा बाळगून विक्रीसाठी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. भोसरी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *