पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – जुना पुणे-मुंबई हायवे ओलांडणाऱ्या एका पादचाऱ्याला भरधाव कारने जोरात धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २७) रात्री साडेबाराच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील बगीचा हॉटेलसमोर घडली.
याप्रकरणी पोलीस शिपाई मच्छिंद्र किसन कांदळकर (वय ३०) यांनी सोमवारी (दि. २७ एप्रिल) रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार चालक सोमेश्वर रंगनाथ काळे (वय ३४, रा. जांभूळ, ता. मावळ) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमेश्वर काळे हा आपली वॅगनार कार (MH.04.GJ.1272) घेऊन भरधाव वेगाने जात होता. रस्ता ओलांडणारे रामबाबू चनेश्वर राम (वय ३६) यांना कारने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात रामबाबू यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचा तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील महिला उपनिरीक्षक गावडे करत आहेत.
भरधाव कारच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; चालक अटकेत
