गुटख्याची विक्री करणार्‍याला अटक

पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गुटख्याची विक्री
केल्याप्रकरणी एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरीतील
संजय गांधीनगर येथे बुधवारी (दि. २९) करण्यात आली. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी
सायली शंकर टावरे यांनी
पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कमलेश रमेश गुप्ता (वय २५, रा.
गांधीनगर – काळेवाडी रोड, पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. रमेश गुप्ता
जनरल स्टोअर्स येथे बंदी असलेला गुटखा, सुगंधी तंबाखू आणि पान मसाला
विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळले. कारवाईदरम्यान सुमारे २ हजारांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *