-आयटी पार्क हिंजवडी परिसरातील एका सदनिकेला आज दुपारी अचानक भीषण आग लागली आहे.
-हिंजवडी आयटी पार्क फेज थ्री परिसरातील मेनलो सोसायटी मधील एका सदनिकेला अचानक दुपारी भीषण आग लागली आहे.
-सदनिकेतील टेबल फॅन मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अग्निशमन दलाचा प्राथमिक अंदाज आहे.
-या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.
-पी एम आर डी ए च अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने मिळून सदनिकेला लागलेली आग आटोक्यात आणली आहे.
