जिल्ह्यात बारामती पुन्हा सर्वाधिक उष्ण तालुका; पिंपरी-चिंचवड कितव्या स्थानी ते पाहा

जिल्ह्यात तापमानाचा चढता आलेख कायम

पिंपरी-चिंचवड –
पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून बारामती तालुक्यात पुन्हा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज पुन्हा ३८.२ अंश सेल्सिअस तापमानासह बारामती अव्वल ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उष्णतेचा प्रभाव अधिकच तीव्र झाला आहे.

जिल्ह्यातील तापमानाचा आढावा घेतल्यास बारामतीनंतर मगरपट्टा (३७.१°C) दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरेगाव पार्क आणि शिवाजीनगर (३६.७°C) तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर दौंड (३६.४°C) चौथ्या स्थानी आहे. पिंपरी-चिंचवडमधील डुडुळगाव (३६.२°C) हे पाचव्या क्रमांकावर असून चिंचवड (३५.९°C) सहाव्या स्थानी आहे.

दुपारच्या वेळी शहरात शुकशुकाट दिसत आहे. बारामतीसह ग्रामीण भागात शेतीकामांवर परिणाम जाणवत आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही दुपारी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे.

निमगिरी (३२.८°C) आणि माळीण (३३.८°C) या भागांत तुलनेने कमी तापमानाची नोंद झाली आहे. या भागांना काहीसा दिलासा मिळत आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत बाहेर पडणे टाळावे. पाणी, ताक आणि लिंबूपाणी यांचे सेवन वाढवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *