भरधाव कारने दुचाकीला उडवले; बाप-लेक गंभीर जखमी

पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – भरधाव वेगात येणाऱ्या स्वीप्ट कारने दुचाकीला धडक दिल्याने वडील आणि त्यांची लहान मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना मुळशी तालुक्यातील लवळे येथे शुक्रवारी (दि. १ मे) रोजी सायंकाळी पाच वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​याप्रकरणी एका महिला फिर्यादीने शुक्रवारी (दि. १ मे) रोजी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी कार चालक सौरभ विनायक कोकीळ (रा. पिरंगुट, ता. मुळशी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास फिर्यादीचे पती दत्ता डोंगरे हे मुलगी सईला घेऊन दुचाकीवरून जात असताना रस्त्यात यु-टर्न घेत होते. यावेळी आरोपीने आपली कार (MH 12 XM 8952) भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात फिर्यादीच्या पतीच्या कपाळाला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, मुलीच्या पायालाही गंभीर इजा झाली आहे. पोलीस हवालदार कोंडालकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *