पुसाणेमधील पवना नदीकाठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८०० लिटर रसायन जप्त

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पुसाणे गावच्या हद्दीत पवना नदीच्या बाजूला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई रविवार (दि. ३ मे) रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिलीप राठोड यांनी रविवारी (दि. ३ मे) रोजी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या कारवाईत एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवना नदीच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत हातभट्टी लावली जात होती. पोलिसांनी छापा टाकला असता तिथे दारू तयार करण्यासाठी लागणारे ८०० लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांनी २८ हजार ८०० रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *