Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नका- आमदार जगताप

By Team News Beez
May 4, 2026 2 Min Read
0

धर्मांतराच्या षडयंत्राविरोधात काळेवाडीत ‘आक्रोश’ मोर्चा
दोषींवर कठोर कारवाईसाठी जनसमुदाय रस्त्यावर

पिंपरी , ४ मे : आमिषे दाखवून आणि अंधश्रद्धेचा प्रसार करून हिंदूंचे बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात रविवारी काळेवाडीत ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. ‘काळेवाडी कन्वर्जन फाईल्स’ मधील सत्य समोर आणून दोषींना शिक्षा व्हावी, या मागणीसाठी हजारो हिंदू बांधव आणि महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. “प्रशासनाने हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नये, अन्यथा पुढच्या परिणामांना सरकार जबाबदार असेल,” असा इशारा आमदार शंकर जगताप यांनी यावेळी दिला.

काळेवाडीतील पंचनाथ चौक ते आबाजी नाणेकर चौक दरम्यान हा मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर, आमदार उमा खापरे, ॲड. वर्षाताई डहाळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका नीता पाडाळे, कोमल काळे, सरचिटणीस वैशाली खाडये, चिंचवड-काळेवाडी मंडळ अध्यक्ष ॲड. हर्षद नढे, सामाजिक कार्यकर्ते काळूराम नढे तसेच विविध हिंदू सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोर्चाला संबोधित करताना आमदार जगताप म्हणाले की, “विज्ञानाच्या युगात प्रार्थना करून आजार बरे करण्याचे दावे करणे ही शुद्ध फसवणूक आहे. जर असे असते तर रुग्णालयांची गरजच उरली नसती. गरिबी आणि अज्ञानाचा फायदा घेऊन चाललेला हा धर्मांतराचा बाजार आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये चालू देणार नाही. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून आरोपींना १० लाखांपर्यंत दंड आणि कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”

यावेळी आमदार जगताप यांनी नागरिकांना आवाहन केले की, “आपल्या शेजारी काय घडतेय याकडे डोळेझाक करू नका. असे संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ प्रशासनाला किंवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळवा,” असे आवाहन जगताप यांनी केले. तसेच, विधिमंडळात यावर चर्चा झाली असून मंत्र्यांनीही कारवाईचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

———————————————————————————————————————-

> गोपीचंद पडळकर म्हणाले, “महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या माध्यमातून अशा प्रकारांना लगाम घालण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होणे तितकेच आवश्यक आहे. केवळ कायदे करून प्रश्न सुटणार नाहीत, तर प्रशासनाने अशा प्रवृत्तींच्या मुळाशी जाऊन त्यांना ठेचले पाहिजे. गरिबी आणि अगतिकतेचा फायदा घेऊन जर कोणी हिंदू समाजाला लक्ष्य करत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. आजचा हा जनसमुदाय म्हणजे हिंदू समाजाच्या संतापाचा उद्रेक आहे. जर वेळीच कारवाई झाली नाही, तर हा आक्रोश संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.”

———————————————————————————————————————-

मोर्चातील प्रमुख मागण्या

* बेकायदेशीर धर्मांतर करणाऱ्या मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करा.
* अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रार्थना स्थळांची चौकशी करून ती बंद करा.
* पिंपरी-चिंचवडमधील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करा.
———————————————————————————————————————-

Tags:

MLA Gopichand Padalkar
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

एकलहरे येथे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांच्या नियुक्तीचा व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

Next

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर भीषण अपघात हडपसरमधील २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme