पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – माण-बोडकेवाडी परिसरात विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ४ मे) दुपारी ३:१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश बलसाने यांनी सोमवारी (दि. ४ मे) रोजी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी संजय विश्वनाथ राय (वय ५७, रा. बोडकेवाडी, माण, मूळ रा. पश्चिम बंगाल) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय हा बोडकेवाडीतील एका पत्रा शेडजवळ अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्या ताब्यातून ७८ हजार ५०० रुपये किमतीचा १५७१ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
हिंजवडीत दीड किलो गांजासह एकाला अटक
