Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

​ताथवडे येथे भीषण अपघात; उभ्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर आदळली ​अग्निशमन दलाने पत्रे कापून जखमीला काढले बाहेर; पहाटेच्या सुमारास थरार

By Team News Beez
May 6, 2026 1 Min Read
0

​पिंपरी-चिंचवड :
मुंबई-बेंगलोर महामार्गावर ताथवडे येथे उभ्या असलेल्या ट्रकवर टेम्पो ट्रॅव्हलर पाठीमागून जोरदार आदळली. या भीषण अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी होऊन वाहनातच अडकला होता. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत कौशल्याने या प्रवाशाची सुटका केली. ही घटना बुधवारी (दि. ६) पहाटे पावणे पाच वाजताच्या सुमारास घडली.

रवींद्र राजगुरू (वय ५५, रा. उरुळी देवाची) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच १६ बीसी ७४७५ क्रमांकाचा ट्रक ताथवडे येथील इंदिरा कॉलेजजवळ महामार्गाच्या कडेला उभा होता. दरम्यान, मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली टेम्पो ट्रॅव्हलर (एमएच 10 डीटी 7677) पाठीमागून या ट्रकवर जोरात धडकली.

​केबिनमध्ये अडकला होता पाय
धडक इतकी भीषण होती की टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. यामध्ये समोर बसलेले रवींद्र राजगुरू हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या अंगावर वाहनाचे पत्रे आल्याने ते आतच अडकून पडले होते. घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन केंद्राचा एक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी लोखंडी कटर आणि इतर साहित्याचा वापर करून वाहनाचे पत्रे बाजूला केले. अवघ्या काही मिनिटांत राजगुरू यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

​चालक थोडक्यात बचावला
सुदैवाने या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक थोडक्यात बचावला असून त्याला कोणतीही इजा झालेली नाही. जखमी रवींद्र राजगुरू यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

Pimpri Chinchwad
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

प्राधिकरणात सोमेश्वर मंदिरासमोर मीटर बॉक्सला आग; अनर्थ टळला ​अग्निशमन दलाची वेळेत एन्ट्री: ‘ABC’ यंत्राच्या सहाय्याने आगीवर मिळवले नियंत्रण

Next

गुन्हे शाखेकडून नऊ पिस्तूल अन् ४६ काडतुसांसह चौघे जेरबंद ​देहूरोड गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई; ८ लाखांचा शस्त्रसाठा जप्त

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme