बीडी न दिल्याने कामगारावर चाकूहल्ला मोशीतील लेबर कॅम्पमधील धक्कादायक घटना

​पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पिण्‍यासाठी दुस-यांदा बीडी न दिल्‍याच्‍या कारणावरून एका कामगारावर चाकूहल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्‍यात आला. ही घटना मोशी येथील एका लेबर कॅम्पमध्येसोमवारी रात्री पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास घडली आहे.
​यासुद्दीन सादिक मियाँ अन्सारी (वय २४, रा. ऐश्वर्यम हमारा लेबरकॅम्प, मोशी) असे गुन्‍हा दाखल करण्‍यात आल्‍यानंतर अटक केलेल्‍या आरोपीचे नाव आहे. रिदय ऊर्फ राहुल विकास मंडल (वय १९, सध्‍या रा. मोशी, मुळ गाव- भोपाळ, मध्य प्रदेश) असे जखमी मजुराचे नाव असून त्‍यांनी मंगळवारी (दि. ५ मे) रोजी यासंदर्भात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्‍या सुमारास फिर्यादी राहुल आणि त्याचे मित्र रुममध्ये जेवण करत असताना आरोपी तेथे आला. त्याने राहुलकडे बिडी मागितली, मात्र राहुलने ती देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून आरोपीने शिवीगाळ करत फिर्यादीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *