चिंचवडचा राजा गणपती मंदिरात ‘मोगरा महोत्सव’ उत्साहात ​चंदन उटी सोहळ्याने भक्तिमय वातावरण; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

पिंपरी, दि. ८ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील ‘चिंचवडचा राजा’ गणपती मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला. श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मोगरा महोत्सव व चंदन उटी सोहळा’ मोठ्या उत्साहात पार पडला. सुगंधी मोगऱ्याच्या सजावटीने आणि धार्मिक विधींनी मंदिर परिसराला आकर्षक रूप प्राप्त झाले होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या हस्ते गणरायाची महाआरती करण्यात आली. आरतीवेळी मंदिर परिसरात भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमाला श्री संत ज्ञानेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष ॲड. मोरेश्वर शेडगे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक राहुल कलाटे, ॲड. रोहन जमादार माळवदकर, नगरसेवक मंदार देशपांडे, राजाभाऊ गोलांडे, कुणाल लांडगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि चिंचवडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब पंढरपुरे आणि ब्रह्मवृंद यांच्या उपस्थितीत गणेश सहस्रावर्तने व विविध धार्मिक विधी पार पडले. मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची गर्दी होती.
सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे चार हजारांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मोगऱ्याच्या सुगंधाने आणि भक्तिरसाने भारावलेल्या या सोहळ्याने चिंचवड परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *