.बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; वैमानिक बचावला

बारामती तालुक्यात पुन्हा एकदा शिकाऊ विमान अपघाताची घटना घडली आहे. गोजुबावी गावच्या हद्दीत रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना काही वेळा पूर्वी घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली.
अपघातग्रस्त विमान हे प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे शिकाऊ विमान असल्याची माहिती मिळत आहे. विमान कोसळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
बारामती परिसरात यापूर्वीही प्रशिक्षण विमानांच्या आपत्कालीन लँडिंग आणि अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विमान सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *