Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

बेशिस्तपणा डोळ्यासमोर, तरीही पोलिसांची कारवाईसाठी ‘घाबरगुंडी’ कायद्याचा बडगा फक्त सर्वसामान्यांसाठीच?

By Team News Beez
May 13, 2026 2 Min Read
0

​पिंपरी-चिंचवड :
रस्त्यावर सर्वसामान्य वाहनचालक दिसला की कागदपत्रांची पडताळणी आणि दंडाचा ससेमिरा लावणारे वाहतूक पोलीस नगरसेवक आणि बड्या ठेकेदारांपुढे मात्र ‘नतमस्तक’ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर राजरोसपणे होणाऱ्या बेशिस्त पार्किंगकडे पोलीस सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने, “कायदा काय फक्त सामान्यांसाठीच आहे का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

​खाकीची दहशत की हतबलता?
​दोनच दिवसांपूर्वी मोई चौकात एका महिला वाहतूक पोलिसाने वाहनचालकाच्या अंगावर दगड घेऊन धावून जाण्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांच्या ‘दबंगगिरी’ची चर्चा रंगली आहे. मात्र, हीच ‘दबंगगिरी’ महापालिका भवनासमोर फेल ठरताना दिसते. मुंबई-पुणे महामार्गावर ‘नो पार्किंग’चे फलक असतानाही, त्याच फलकाखाली नगरसेवक आणि ठेकेदारांच्या गाड्या बिनधास्त उभ्या असतात. या धनदांडग्यांवर कारवाई करण्याची हिंमत वाहतूक पोलीस दाखवत नाहीत, हे विशेष.
​
नगरसेवक-ठेकेदारांची मनमानी; वाहतूक कोंडीत सामान्य भरडला
​महापालिकेच्या आऊट गेटपासून गांधीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी आणि चारचाकी वाहनांची रांग लागलेली असते. अनेकदा येथे ‘डबल पार्किंग’ केले जाते, ज्यामुळे हा मुख्य रस्ता अरुंद होऊन मोठी वाहतूक कोंडी निर्माण होते. धक्कादायक म्हणजे, नो पार्किंगमधील वाहने उचलून नेणारे पोलिसांचे ‘टोईंग व्हॅन’ स्वतः या कोंडीत अडकलेले असते, पण जवळच उभ्या असलेल्या नगरसेवकांच्या गाड्यांवर कारवाई करण्याचे धाडस या पथकातील कर्मचाऱ्यांकडे नसते.

​नियम धाब्यावर, पोलीस ‘वाचवावाचव’च्या भूमिकेत!
​दोन न्याय : हेल्मेट नाही किंवा पीयुसी नाही म्हणून सामान्यांना अडवून हजारो रुपयांचा दंड वसूल करणारी पोलीस यंत्रणा, महापालिका भवनासमोरच्या अनधिकृत पार्किंगवर गप्प का?
​
विद्रुपीकरण : शहराचा मुख्य महामार्ग असूनही लोकप्रतिनिधींच्या गाड्यांमुळे या परिसराला पार्किंग तळाचे स्वरूप आले आहे.

​प्रशासनाचे मौन : वाहतूक विभाग या गंभीर विषयावर कारवाई करण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने संशय बळावला आहे.
​
थोडक्यात काय तर, खिशात सत्ता आणि हातात कंत्राट असेल तर नियम तोडण्याचे ‘परवाना’ मिळतो, आणि सामान्य नागरिक मात्र पोलिसांच्या वसुलीचा ‘टार्गेट’ ठरतो, हेच चित्र आज पिंपरी-चिंचवडमध्ये दिसत आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

.बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; वैमानिक बचावला

Next

सद्गुरू सेवा मंडळ तळेगाव दाभाडे ह्यांच्या वतीने अधिकमासनिमित्त “श्री स्वामी समर्थ” मंत्राच्या सव्वा कोटी जपाचा संकल्प

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme