​शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने २१ लाखांचा गंडा

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – जादा परताव्याचे आमिष दाखवून शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली च-होली येथील एका व्यक्तीची २१ लाख ३४ हजार ३९९ रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. ही घटना १५ मार्च ते ३ मे २०२६ या कालावधीत घडली.
​याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पुरुष फिर्यादीने बुधवारी (दि. १३ मे) रोजी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला ‘S-VIP 7 MOTILAL OSWAL’ नावाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करून घेण्यात आले होते. आरोपींनी त्यांना ‘risseastock.top’ या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करण्यास भाग पाडले. सुरुवातीला फिर्यादीच्या खात्यावर मोठी नफा झाल्याचे दिसत होते, मात्र जेव्हा त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांचे खाते ब्लॉक करण्यात आले. पैसे काढण्यासाठी पुन्हा १५ लाख रुपये टॅक्स म्हणून भरण्याची मागणी करण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. दिघी पोलीस ठाण्‍यातील निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *