पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – रावेत परिसरात एका ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅपवर अज्ञात लिंक पाठवून त्यांच्या मोबादलचा अॅक्सेस मिळवत, क्रेडिट कार्डद्वारे सुमारे चार लाख ७४ हजार ७७४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना८ मे ते ९ मे २०२६ दरम्यान घडली.
याप्रकरणी एका अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदानंद सदाशीव गोखले (वय ७७, रा. निगडी प्राधिकरण) यांनी बुधवारी (दि. १३ मे) रोजी यासंदर्भात रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ मे ते ९ मे २०२६ दरम्यान फिर्यादी गोखले यांना एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅपवर एक ‘APK’ फाईल पाठवण्यात आली. ती फाईल डाऊनलोड करताच आरोपीने त्यांच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला. त्यानंतर फिर्यादीच्या आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या क्रेडिट कार्डवरून चार लाख ७४ हजार ७७४ रुपये परस्पर काढून घेतले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक फटांगरे या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
व्हॉट्सअॅपवर ‘APK’ फाईल पाठवून ज्येष्ठ नागरिकाची ५ लाखांची फसवणूक
