थेरगाव येथे बनावट चावीने घरफोडी; ११ लाखांचे सोने लंपास; एकास अटक

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – एका बंद घराचे बेडरूमचे लॉक बनावट चावीने उघडून दिवाणमधील ट्रॅव्हलिंग बॅगेत ठेवलेले ११ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने एका चोरट्याने पळवले. ही घटना ४ मे ते १२ मे दरम्यान लक्ष्मणनगर थेरगाव येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने बुधवारी (दि. १३ मे) रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार योगेश लहु जाधव (वय २६, लक्ष्मणनगर, थेरगाव पुणे; मूळ गाव – घोरवाडी, हुमनाबाद, बिदर) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी महिला बाहेर गेलेली असताना चोराने बनावट चावीच्या साहाय्याने बेडरूमचे कुलूप उघडले. बेडरूममधील दिवाणमध्ये ठेवलेल्या ट्रॅव्हलिंग बॅगेतून चोराने एकूण १४ तोळे १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत ११ लाख २८ हजार रुपये आहे, ते चोरून नेले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *