भ्उच्‍चभ्रू सोसायटीतील मंदिराची दानपेटी भरदिवसा फोडली; एकावर गुन्‍हा

​पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – एका उच्‍चभ्रू सोसायटी असलेल्‍या महादेव मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सव्‍वासहा वाजताच्‍या सुमारास मावळ तालुक्यातील गहुंजे येथील लोढा सोसायटीमध्ये घडली आहे.
कैलास श्रीराम राठोड (वय २८, रा. सोमाटणे फाटा, मूळ रा. बुलढाणा) असे गुन्हा दाखल करण्‍यात आलेलया आरोपीचे नाव आहे. सचीन अशोक नरसींगे (वय ४०, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी शनिवारी (दि. १६ मे) रोजी यासंदर्भात शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लोढा सोसायटीत सिक्युरीटी सुपरवायझर म्हणून काम करतात. १५ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान अज्ञात चोरट्याने मंदिरातील धातूची दानपेटी चोरून ती मंदिराच्या पाठीमागे नेली. तिथे दानपेटीचा कोयंडा उचकटून त्यातील अंदाजे १५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पारखे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *