पिंपरीत वेश्या व्यवसायासाठी खुणावणाऱ्या महिलेवर गुन्हा

​पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पिंपरी येथील मुख्य चौकातील रस्त्यावर ग्राहकांना डोळ्याने आणि हाताने लैंगिक हावभाव करून वेश्या व्यवसायासाठी आकर्षित करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १९ मे) रोजी सायंकाळी पावणेपाच वाजेच्या सुमारास आंबेडकर पुतळा चौक ते शगुन चौकादरम्यान असलेल्या सिटी प्लाझा लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.
​याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील गजबजलेल्या सिटी प्लाझा लॉजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर संबंधित महिला आरोपी ही वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने उभी होती. ती रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना शब्दांनी, डोळ्याने खुणावून तसेच हाताने लैंगिक हावभाव करून अडथळा निर्माण करत होती. सार्वजनिक ठिकाणी सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. ​या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार गायकर करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *