आकुर्डी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाने आकुर्डी येथे छापा टाकून बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या आकुर्डी येथील एका ५८ वर्षीय महिलेला अटक केली. ही कारवाई बुधवारी (२० मे) दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास खंडोबा माळ, आकुर्डी येथे करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई मितेश यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सत्यम फॅब्रिकेशन शेजारील गल्लीत एक महिला अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, संबंधित महिलेच्या ताब्यात १७ हजार २०० रुपये किमतीचा ३४४ ग्रॅम गांजा मिळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *