पानटपरीतून ३७ हजारांचा गांजा जप्त

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका पानटपरीत विक्रीसाठी ठेवलेला ३७ हजार ५५० रुपये किमतीचा ७५१ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका ६० वर्षीय वृद्धाला अटक केली आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील महाळुंगे येथे मंगळवारी (दि. २६ मे) रोजी सायंकाळी सव्‍वासहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
गहिनीनाथ लक्ष्मण जोशी (वय ६०, रा. सदगुरु मिसळ जवळ, ता. खेड, जि. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस शिपाई महेश नामदेव गायकवाड (वय ३२) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. बुधवारी सायंकाळी ६:१८ वाजता सदगुरु मिसळ जवळील एका पानटपरीमध्ये आरोपीने गांजा विक्रीसाठी बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *