कन्स्ट्रक्शन साइटवरून १ लाख रुपयांची वायर चोरीला

​पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – एका कन्स्ट्रक्शन साइटच्या साहित्याच्या खोलीतून एक लाख ३ हजार ८०१ रुपये किमतीचे वायरचे बंडल चोरून नेले. याप्रकरणी कामावरील एका कामगाराला अटक केली आहे. ही घटना ४ मे ते ११ मे या कालावधीत आदर्शनगर, देहूरोड येथे घडली.
​दत्तात्रय अरुण पवार (वय ३८, रा. शिंदे पेट्रोल पंपामागे, विकासनगर, देहुरोड) याला पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. समाधान राजाराम नवले (वय ३२, रा. पलाश २४ अपार्टमेंट, जुना आळंदी रोड, मोशी) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सॅन्टीयागो कन्स्ट्रक्शनच्या बाजूला असलेल्या बांधकाम साहित्याच्या खोलीतून आरोपीने फिर्यादीच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी ही वायर चोरली होती. ​या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विधाते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *