पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – भरधाव आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना नाशिक-पुणे हायवेवर चिंबळी फाट्याजवळ सोमवारी (दि. २५ मे) रोजी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली.
आयशर गाडी (MH 12 SX 4481) वरील अज्ञात चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश वैकुंठराव भगत (वय २१, रा. साने चौक, चिखली; मूळ रा. बेलेरा खुर्द, जि. वर्धा) यांनी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मावस भाऊ शिल्केश प्रल्हाद काळपांडे व त्याचा मित्र रुपेश दिगंबर भरकक्षे हे दुचाकीवरून (MH 32 AQ 8943) जात असताना आयशर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून त्यांना पाठीमागून धडक दिली, ज्यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करीत आहेत.
आयशरच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
