मांजराच्या वादातून ताथवडे येथे कुटुंबाला विटांनी मारहाण

पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – पाळीव मांजरी घराच्या छतावर येण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका ज्येष्ठ महिलेसह तिच्या मुलांना विटा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 26 मे) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली.
सीमा अनिल सूर्यवंशी, मानसी सूर्यवंशी आणि सारंग सूर्यवंशी (सर्व रा. पंचशील नगर, ताथवडे गावठाण, ता. मुळशी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात कविता चिंतामणी सोनवणे (वय 60 वर्षे, रा. पंचशील नगर, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची पाळीव मांजरे फिर्यादी यांच्या घरावर येत असल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. आरोपी सीमा आणि तिच्या मुलीने कविता यांचे केस ओढून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच वेळी आरोपी सारंग याने फूटपाथवरील वीट उचलून कविता यांच्या कपाळावर मारून त्यांना रक्तबंबाळ केले. वाकड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक जगदाळे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *