पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – रस्त्यावर पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून शेजार्यांनी एका कुटुंबावर हातोडी आणि दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात चारजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास बावधन येथे घडली.
राजेश राजपूत, चेतन राजपूत आणि राधिका राजपूत (सर्व रा. भुंडे वस्ती, क्षत्रियनगर, बावधन, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यश सुनील राजपूत (वय 22, रा. बावधन, पुणे) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावाने रस्त्यावर पाणी मारल्याने पाणी घरात येते, असे म्हणून आरोपींनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. वादादरम्यान आरोपींनी यश यांच्या आईला धक्का देऊन यशला पकडून ठेवले, तर राधिका राजपूत हिने यशच्या डोक्यात हातोडीने व दगड फेकून जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या यश यांच्या मामांना, भावाला आणि पत्नीलाही आरोपींनी दगडाने व हाताने बेदम मारहाण केली. पुढील तपास बावधन पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
रस्त्यावर पाणी मारल्याच्या कारणावरून चौघांवर दगड, हातोडी हल्ला
