Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

पुणे जिल्ह्यात तुकाराम मुंढे पॅटर्न! आंबेगाव आणि खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; १९ लाखांचा साठा जप्त

By Team News Beez
June 1, 2026 2 Min Read
0

​पुणे:
ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या अन्नमाफियांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पाऊल उचलले आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड तालुक्यात ५ वेगवेगळ्या ठिकाणी धडक छापे टाकण्यात आले. या धडक मोहिमेत तब्बल १९ लाख ३ हजार ३७९ रुपये किमतीचा गुटखा, विनापरवाना आटा-मैदा आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

​या धडक कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील अन्नभेसळ करणाऱ्या आणि विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पहिल्या कारवाईत​मंचरमध्ये गुटखा जप्त; ‘बीएनएस’ अंतर्गत गुन्हा दाखल
​आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पोलिसांनी आणि प्रशासनाने मोठी कारवाई केली. येथील ‘साईराज पान अँड टी हाऊस’ तसेच ‘समीक्षा कोल्ड्रिंक जनरल अँड किराणा स्टोअर’ यांच्या पाठीमागील गोदामात बेकायदेशीरपणे लपवून ठेवलेला ३० हजार ३९५ रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी संबंधित आरोपींवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

​दुसऱ्या कारवाईत खेमराज फूड इंडस्ट्रीजवर छापा; १० लाखांचा माल जप्त
​मंचर येथीलच ‘खेमराज फूड इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नामांकित आस्थापनेची तपासणी केली असता, ही कंपनी कोणतीही अधिकृत परवाना नोंदणी न करता बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचे उघड झाले. प्रशासनाने तेथून विक्रीसाठी ठेवलेला मैदा, बेसन, आटा आणि इतर अन्नपदार्थांचा तब्बल १९ हजार ८८६ किलोचा (किंमत १० लाख ४९ हजार ३६४ रुपये) साठा जप्त केला असून, त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

तिसऱ्या कारवाईमध्ये खेड तालुक्यात ८ लाखांची ‘असुरक्षित’ सुपारी जप्त
​खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील ‘उज्वल सुपारी’ या आस्थापनेवरही प्रशासनाने विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी कारवाई केली. येथील विक्रीसाठी ठेवलेली सुपारी ही मानवी आरोग्यासाठी ‘अप्रमाणित आणि असुरक्षित’ असल्याच्या संशयावरून १ हजार ८९८ किलो वजनाचा आणि ८ लाख १६ हजार १४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

​ चौथ्या कारवाईमध्ये वाटाण्याला कृत्रिम रंग! ‘ओम साई फरसाण’वर कारवाई
​नरे येथील ‘ओम साई फरसाण’ या दुकानात ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. येथील ‘फ्राईड ग्रीन वाटाणा’ या खाद्यपदार्थाला अधिक हिरवेगार दाखवण्यासाठी घातक कृत्रिम रंगाचा वापर केला जात असल्याचे तपासणीत आढळले. प्रशासनाने ७ हजार ४८० रुपये किमतीचा ६८ किलो वाटाणा आणि कृत्रिम रंगाचे नमुने भेसळीच्या संशयावरून जप्त केले आहेत.

​धडक कारवाई करणारे अधिकारी
​पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) दि.वा. भोगावडे यांच्या निर्देशानुसार आणि सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे, प्रदीप आंबरे यांच्या उपस्थितीत ही मोहीम राबवण्यात आली. या पथकात अन्न सुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजीत झोडगे, आदित्य जोशी, साकेत सूर्यवंशी आणि नमुना सहाय्यक श्री. साळवे यांचा समावेश होता.

​”नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे!”
“ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या, निकृष्ट, भेसळयुक्त व बेकायदेशीर अन्न उत्पादन करणाऱ्या आस्थापनाविरुद्ध ही मोहीम अशीच तीव्र गतीने सुरू राहणार आहे. नागरिकांना कुठेही असा गैरप्रकार आढळल्यास त्यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी.”
— अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

Tags:

(FDA)
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

विश्वासू कर्मचाऱ्यानेच मारला डल्ला ३६ लाखांच्या स्टील टाक्या चोरीचा गुन्हा उघड

Next

​रावेतमध्ये महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे गोठ्याला भीषण आग अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, जनावरांची सुटका!

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme