भांडण सोडवणाऱ्याला सिमेंटचा गट्टूने मारहाण

पिंपरी, दि. ३ (प्रतिनिधी) – मित्रासोबत सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका तरुणाजा सिमेंटच्‍या गट्टूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना पिंपरीतील युगांतर चौकात रविवारी (दि. ३१ मे) रोजी घडली.
सुरज रमेश सरवदे (वय ३२, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांनी मंगळवारी (दि. २ जून) रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हितेश राकेश वाल्मिकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी मित्र कुणाल ठाकूर याला मारहाण होत असल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेले होते. त्याचा राग आल्याने आरोपीने सिमेंटचा गट्टू तोंडावर मारला. या हल्ल्यात सुरज यांचा पुढील दात तुटला. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *