मुंबई
आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय टी-20 संघाची घोषणा केली असून, या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यरने पुन्हा भारतीय टी-20 संघात स्थान मिळवले आहे, तर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीलाही प्रथमच मोठी संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघाचा हा दौरा आगामी टी-20 विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. निवड समितीने अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
