Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

By Sumedh Chapalgaonkar
June 5, 2026 2 Min Read
0

*इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

*मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार*

*महाराष्ट्रात ४०८० कोटींची गुंतवणूक; प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ४७५० रोजगारांची निर्मिती*

राज्य शासनाला तुमचा भागीदार समजा. राज्यात संपूर्ण औद्योगिक परिसंस्था उभी राहावी, ही राज्य शासनाची भूमिका आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे शक्तिकेंद्र असलेल्या महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे उद्योगांच्या विस्तारासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योजकांना दिली.

 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ निवासस्थानी महाराष्ट्र शासन आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रातील आघाडीची जेबिल तसेच महाराष्ट्र शासन आणि दुबईस्थित आरएसए ग्लोबल यांच्यात दोन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे महाराष्ट्रात ४ हजार ८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ४ हजार ७५० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत.

 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक गुंतवणूक, निर्यात क्षमता आणि आधुनिक लॉजिस्टिक्स व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला वेग मिळेल. तसेच इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान आणखी मजबूत होणार आहे.

 

पुण्यात जेबिलचा १५०० कोटींचा विस्तार प्रकल्प

जेबिल कंपनी पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस (ईएमएस) विस्तार प्रकल्प उभारणार आहे. ५जी उपकरणे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित नेटवर्किंग स्विचगिअर्सच्या उत्पादनासाठी कंपनी १ हजार ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यातून सुमारे ४ हजार थेट रोजगार निर्माण होणार आहेत. महाराष्ट्रात गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या जेबिलचे राज्यात १० हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीची नवी अत्याधुनिक उत्पादन सुविधा १७ जून २०२६ रोजी सुरू होणार आहे.

 

रायगडमध्ये अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क

महाराष्ट्र शासन आणि आरएसए लॉजिस्टिक्स अँड ट्रान्सपोर्टेशन प्रा. लि. यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामंजस्य करारानुसार रायगड जिल्ह्यातील उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) परिसरात २५ हेक्टर क्षेत्रावर अत्याधुनिक ‘अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क’ उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी २ हजार ५८० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून सुमारे ७५० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. कंटेनर स्टॅकिंग, कंटेनर धुलाई व स्वच्छता, दुरुस्ती, रिकाम्या कंटेनर्सची हाताळणी आणि साठवण यांसारख्या अत्याधुनिक सुविधा येथे विकसित करण्यात येणार आहेत.

 

यावेळी जेबिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक माईक दस्तूर, आरएसए ग्लोबलचे संचालक अजय शाह तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अन्बलगन, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.

Tags:

Maharashtra will create a distinct identity in the field of electronics manufacturing and modern logistics Chief Minister Devendra Fadnavis
Author

Sumedh Chapalgaonkar

Follow Me
Other Articles
Previous

mumbai-५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ

Next

Mumbai-तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांना स्वयंरोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २५ हजार रुपयांपासून ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य*

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
  • बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
  • दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

CATEGORIES

  • Uncategorized (439)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (877)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
  • राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग
July 23, 2026

Pune-पावसाचा जोर कायम; वडीवळे धरणाचा विसर्ग वाढवला, खडकवासला धरणातूनही लवकरच पाणी सोडण्याची शक्यता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून वडीवळे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

राजगड तालुक्यात रस्ता खचला; बालवड–शेनवड मार्ग वाहतुकीसाठी बंद अतिवृष्टीचा फटका; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पुणे : राजगड (वेल्हा) तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे माळवडी–जोगवडी–भुतुंडे–बालवड–शेनवड या प्रमुख मार्गावरील बालवड येथे...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

Pimpri-Chinchwad-नाशिक फाटा–खेड उन्नत कॉरिडॉरच्‍या भू संपादनासाठी १७५ कोटींचा निधी आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; रखडलेल्या प्रक्रियेला मिळणार वेग

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या महत्त्वाकांक्षी नाशिक फाटा–खेड दुहेरी उन्नत कॉरिडॉर...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

दुचाकीवरून दारूची वाहतूक; महिलेस अटक

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका महिलेला दारूबंदी पथकाने...

Read More
July 23, 2026
July 23, 2026

बँक खाते वापरण्‍यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक

Sumedh Chapalgaonkar

​पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी...

Read More
July 23, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme