Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
राज्य

कांद्यावर अश्रू ढाळणाऱ्या रोहित पवारांनी आधी शरद पवारांच्या कृषिमंत्रीपदाचा हिशेब द्यावा; भाजपचा सवाल

By Team News Beez
May 31, 2026 2 Min Read
0

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर भाजपने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधत, “कांद्यावर अश्रू ढाळण्यापूर्वी शरद पवार यांनी देशाचे कृषिमंत्री असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय केले याचा हिशेब द्यावा,” अशी मागणी केली.

नवनाथ बन म्हणाले की, आज रोहित पवार कांद्याला २५ रुपये प्रतिकिलो भाव देण्याची मागणी करत आहेत. मात्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे जाणून घ्यायचे आहे की, शरद पवार तब्बल दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती वेळा न्याय्य दर मिळाला? त्या काळात अनेकदा कांद्याचे दर कोसळले, शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आणि काही ठिकाणी एक ते दोन रुपये किलो दराने कांदा विकावा लागला होता.

भाजपच्या मते, त्या काळात ना मोठी आंदोलने झाली, ना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एवढी आक्रमक भूमिका घेण्यात आली. आज मात्र शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, सध्याच्या सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना केल्या असून कांद्याच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आंदोलन करून प्रसिद्धी मिळविण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना काय केल्या याचे उत्तर रोहित पवार यांनी द्यावे.

“आज आंदोलन आणि काल मौन” अशी भूमिका पवार कुटुंबाची राहिली असल्याचा आरोप करत बन म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करता येणार नाही. महाराष्ट्रातील शेतकरी जागरूक असून त्यांनी भूतकाळातील घडामोडी विसरलेल्या नाहीत.

शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना आणि सकारात्मक भूमिका आवश्यक आहे. मात्र केवळ राजकीय टीका करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करण्याऐवजी कृषी क्षेत्रासाठी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

केंद्र सरकारच्या अहवालानुसार पुणे शहर क्राईमच्या बाबतीत राज्यात पहिले तर देशात पाचवे क्रमांकाचे शहर

Next

ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांचा डल्ला; ४१ तोळे बनावट सोने ठेवून फसवणुकीचा प्रयत्न

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
  • Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप
  • Pimpri-Chinchwad-दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ नेहरूनगर न्यायालयात वकिलांचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा
  • संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

CATEGORIES

  • Uncategorized (449)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (879)
  • पुणे (135)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’
  • Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप
July 24, 2026

Delhi-सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर इमरान मसूद यांची टीका; ‘हे अण्णा हजारे पार्ट-2, सर्व काही स्क्रिप्टेड’

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार इमरान मसूद यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर टीका...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Mumbai-दादरमधील आंदोलनादरम्यान महिला आंदोलकाशी गैरवर्तनाचा आरोप; व्हायरल व्हिडिओवरून मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : दादर परिसरात विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनात पॅलेट गन वापरली का? सीआरपीएफकडून चौकशी; राहुल गांधींचा गंभीर आरोप

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : 20 जुलै रोजी दिल्लीतील संसद मोर्चादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरून नवा वाद निर्माण...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईच्या निषेधार्थ नेहरूनगर न्यायालयात वकिलांचे आंदोलन; विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, २४ जुलै : दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक प्रश्नांबाबत सुरू केलेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

संवादातून तणाव निवळला : पुणे पोलिसांच्या समन्वयाने हिंदू संघटनांनी आंदोलन मागे घेतले

Sumedh Chapalgaonkar

दिल्लीस्थित *कॉकरोच जनता पक्ष (CJP)* यांच्या पुण्यातील हालचालींमुळे निर्माण झालेल्या संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme