कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे-मुंबई महामार्गावर फुगेवाडी येथे भरधाव वेगात जाणाऱ्या कारने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (५ जून) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडला. रावसाहेब वामनराव कंडाळे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अभिषेक वसंत बोरसे (२२, मोशी ) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालक संजय विनायक अकोलकर (५८, नवी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय अकोलकर याने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवली. फुगेवाडी येथे सँडविक कंपनीच्या समोर आल्यानंतर त्याने रावसाहेब यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. रावसाहेब या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *