Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पुणे

रुग्णालय गाठण्याआधीच नवजीवनाची चाहूल; ‘१०८’ रुग्णवाहिकेत राज्यभरात ४२ हजारांहून अधिक सुरक्षित प्रसूती

By Team News Beez
June 12, 2026 2 Min Read
0

वाहतूक कोंडी, दुर्गम भाग आणि आपत्कालीन परिस्थितीवर मात; हजारो माता-बालकांसाठी ‘१०८’ ठरली जीवनरेषा

पुणे :
प्रसूतीच्या वेदनांनी तडफडणाऱ्या गर्भवती महिलांसाठी ‘१०८’ रुग्णवाहिका सेवा केवळ वाहतूक व्यवस्था राहिलेली नाही, तर ती अनेक कुटुंबांसाठी नवजीवन देणारी जीवनरेषा ठरली आहे. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रसूतीची वेळ आल्याने राज्यभरात तब्बल ४२ हजारांहून अधिक महिलांची सुरक्षित प्रसूती थेट रुग्णवाहिकेत पार पडली आहे. प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हजारो माता आणि नवजात बालकांचे प्राण वाचले असून, आपत्कालीन आरोग्य सेवेमधील हा एक उल्लेखनीय टप्पा मानला जात आहे.

मे २०२६ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मिळून ४२ हजार ७८६ महिलांनी रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला आहे. अचानक सुरू झालेल्या प्रसूती वेदना, दुर्गम भागातील अंतर आणि शहरांतील वाहतूक कोंडी यामुळे अनेक महिलांना वेळेत रुग्णालय गाठणे शक्य झाले नाही. अशा वेळी ‘१०८’ सेवेमधील डॉक्टर, वैद्यकीय तंत्रज्ञ आणि आपत्कालीन कर्मचारी यांनी प्रसूतीची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली.
अत्याधुनिक आरोग्य सुविधा असलेल्या शहरातही वाहतूक कोंडी मोठे आव्हान ठरते. त्यामुळे अनेक वेळा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच प्रसूतीची वेळ येते. मुंबईत अशा ८३० महिलांनी रुग्णवाहिकेतच सुरक्षित प्रसूती केली आहे. हा आकडा शहरातील आपत्कालीन आरोग्य सेवेचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे.

सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यातील महिलांना
या सेवेचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यातील महिलांना मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात तब्बल ३ हजार ८६१ प्रसूती रुग्णवाहिकेत पार पडल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्यात ३ हजार ३१०, सोलापूरमध्ये २ हजार ४०५ आणि सातारा जिल्ह्यात २ हजार १५१ प्रसूतींची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात १ हजार ८२९ महिलांनी, कोल्हापूरमध्ये १ हजार ७२४ महिलांनी, औरंगाबादमध्ये १ हजार ६८९ महिलांनी तर अहिल्यानगर जिल्ह्यात १ हजार १४१ महिलांनी रुग्णवाहिका सेवेच्या मदतीने सुरक्षित प्रसूती केली आहे. सिंधुदुर्गसारख्या तुलनेने कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातही २४७ प्रसूती रुग्णवाहिकेत पार पडल्या आहेत.

आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, ही आकडेवारी राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे वास्तवही दाखवते. मात्र त्याचवेळी आपत्कालीन परिस्थितीत ‘१०८’ सेवा किती प्रभावीपणे काम करत आहे, हे देखील स्पष्ट करते. वेळेशी सुरू असलेल्या शर्यतीत या सेवेमुळे अनेक माता आणि नवजात बालकांना सुरक्षित आयुष्य मिळाले आहे.

गेल्या काही वर्षांत ‘१०८’ सेवेमध्ये प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तत्पर प्रतिसाद यावर विशेष भर देण्यात आला आहे. त्याचा थेट परिणाम या यशस्वी प्रसूतींमध्ये दिसून येत आहे. अनेक महिलांसाठी रुग्णवाहिकेच प्रसूतीगृह ठरली. तर हजारो कुटुंबांसाठी ‘१०८’ ही सेवा संकटसमयी धावून येणारी देवदूत ठरली आहे.

राज्याच्या आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेतील ही कामगिरी केवळ आकडेवारी नाही, तर हजारो मातांच्या सुरक्षित मातृत्वाची आणि हजारो नवजात बालकांच्या नवजीवनाची प्रेरणादायी कहाणी आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad मानसिक छळाला कंटाळून टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या सुसाईड नोटमध्ये महिला सहकाऱ्यांवर गंभीर आरोप; भोसरीत तिघांविरोधात गुन्हा

Next

नोकरी मिळेना, लग्न जमेना! नैराश्यातून बीडच्या ३२ वर्षीय तरुणाची भंडारा जवळ गळफास लावून आत्महत्या

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme