पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या एका गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास मोशी टोल नाका येथे करण्यात आली.
आशिष प्रकाशराव शेळके (वय २७, रा. मोशी) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई ज्ञानेश्वर विष्णूबुवा गिरी यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला परिमंडळ-३ मधून तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याने बंदी आदेशाचे उल्लंघन करून मोशी टोल नाक्याजवळ ५०० रुपये किमतीचा लोखंडी कोयता बाळगताना मिळून आला. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहे.
कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक
