पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील माण गावातील जुनी विटभट्टी बोडकेवाडी येथे भांडण का करता? अशी विचारणा करणाऱ्या महिला व त्यांच्या मुलीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली आहे.
अजय इंगवले, अशोक इंगवले, भैया इंगवले आणि एक महिला आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी घरी काम करत असताना घरासमोर आरोपी आले. फिर्यादीने त्यांना ‘भांडू नका, भांडणे कशाला करता’ असे विचारले असता, आरोपींनी तिला ‘तुमचा काय संबंध’ असे म्हणून फिर्यादीच्या पाठीत, मनगटावर व करंगळीवर लाकडी दांडक्याने मारून दुखापत केली. तसेच इतर आरोपींनी त्यांच्या मुलीला मारहाण व शिवीगाळ केली. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
भांडणाबाबत विचारणा केल्याने महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण
