दंडाच्या जादा पैशांवरून मासे विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील वासुली गावाच्या हद्दीतील बाजारतळ येथे बसण्यासाठी पावतीच्या पैशांव्यतिरिक्त जादा दंडाची मागणी केल्याच्या कारणावरून एका मासे विक्रेत्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. ११ जून) रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे.
​शिवाजी सदाशिव राउत (वय ५५), मंगेश शिवाजी राउत (वय २९, दोघेही रा. भांबोली, ता. खेड, जि. पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर पप्पू रघुनाथ लिंभोरे आणि महेश भाऊसाहेब लिंभोरे (दोघेही रा. आसखेड, ता. खेड, जि. पुणे) यांच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. शहबाज अब्दुललतीफ शाह (वय २०, रा. वासुली, खेड, जि. पुणे) यांनी उत्‍तर महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी राऊत हा बाजारतळात बसण्यासाठी रोजचे ६०० रुपये पावतीचे घेण्यासाठी आला असता त्याने दंडाचे २०० रुपये जास्त मागितले. फिर्यादीने जादा रक्कमेबाबत विचारणा केल्याने चिडून जाऊन आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीचा भाऊ अलताफ शहा याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणाचा पुढील तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *