चिंचवडच्या ‘विवांत फॅमिली थाई स्पा’वर पोलिसांचा छापा

​पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – चिंचवड येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवरील प्रीमियर प्लाझा मॉलमध्ये सुरू असलेल्या ‘विवांत फॅमिली थाई स्‍पा’ वर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून ही कारवाई शुक्रवारी (दि. ११ जून) रोजी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
या प्रकरणी आरोपी शाहनवाज माहमुद रिफाई (वय ४१, सध्या रा. रहाटणी, मूळ रा. रायगड) याला अटक केली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस हवालदार गणेश सिताराम कारोटे (वय ३८) यांनी चिंचवड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला आणि स्वतःची उपजीविका भागविली. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *