बंदूक व काडतुसांसह आरोपीला अटक

पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील नेहरूनगर परिसरातील दोस्ती बेकरीच्या मागे वाल्मीकी चाळ येथे विनापरवाना एक बारा बोअर बंदूक व ५ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री साडेदहा वाजताच्‍या सुमारास करण्‍यात आली.
​अजयकुमार गोपाल सिंह (वय ३७ वर्षे, रा. वाल्मीकी चाळ, नेहरूनगर, पिंपरी, मूळ- बिहार) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार संतोष भानुदास राजपूत यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.
​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस सहआयुक्तांनी परिसरात घातक शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश लागू केला होता. या आदेशाचा भंग करून आरोपीने स्वतःच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीची १२ बोअर बंदूक व ५०० रुपयांची ५ जिवंत काडतुसे विनापरवाना बाळगली असताना तो रंगेहात सापडला. या प्रकरणाचा पुढील तपास संततुकारामनगर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *