Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

‘स्मार्ट’ मीटर की ‘स्मार्ट’ लूट? महावितरणच्या दाव्यांवर ग्राहकांचा थेट सवाल

By Team News Beez
June 14, 2026 2 Min Read
0

४८ तासांची सक्ती, एकाच वेळी हजारो ग्राहकांना मेसेज

‘तक्रारी घटल्या’ म्हणणाऱ्या महावितरणवर संतप्त ग्राहकांचा सवाल – मग आंदोलन का सुरू आहेत?

पिंपरी-चिंचवड ः
एका बाजूला राज्यभरातील ग्राहकांना अवघ्या ४८ तासांत स्मार्ट मीटर बसवून घेण्याचे संदेश पाठवले जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाल्याचा महावितरणचा दावा नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरत असून, या दाव्याविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पुणे जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट मीटरविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ग्राहकांनी जुन्या मीटरच्या तुलनेत वीजबिलात अनपेक्षित वाढ झाल्याचा आरोप केला आहे. काही ठिकाणी नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविणाऱ्या पथकांना विरोध केला, तर अनेक ठिकाणी आंदोलनांचा मार्ग स्वीकारला आहे. असे असताना महावितरणने प्रसिद्धीपत्रक काढून तक्रारी कमी झाल्याचा दावा केल्याने नागरिकांमध्ये संताप अधिकच वाढला आहे.

सर्वाधिक संतापाची बाब म्हणजे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याचे संदेश पाठवून ४८ तासांची मुदत दिली जात असल्याची चर्चा आहे. अनेक ग्राहकांनी याला सक्तीचे स्वरूप असल्याचा आरोप केला आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या शंकांचे समाधान न करता स्मार्ट मीटर बसविण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे.

महावितरणकडून स्मार्ट मीटरमुळे अचूक रिडिंग, मोबाईल ॲपद्वारे वापरावर नियंत्रण, वीजगळती शोधणे आणि विविध सवलती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात वाढीव बिलांच्या तक्रारी, मीटरच्या अचूकतेबाबतचे प्रश्न आणि ग्राहकांच्या शंकांचे समाधान न झाल्याने नागरिक या दाव्यांवर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत.

ग्राहक संघटनांच्या मते, तक्रारी कमी झालेल्या नसून अनेक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रतिसाद न मिळाल्याने पाठपुरावा सोडला आहे. त्यामुळे तक्रारींची संख्या कमी दिसत असली तरी समस्या कायम आहेत. “तक्रारी कमी झाल्या म्हणजे समस्या सुटल्या असे होत नाही,” असा सूर विविध ग्राहक संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीपूर्वी स्वतंत्र तांत्रिक चाचणी, बिलवाढीच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी आणि ग्राहकांच्या शंकांचे सार्वजनिक निरसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा राज्यभर स्मार्ट मीटरविरोधी आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

“स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना फायदा झाला की फटका?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असताना, महावितरणचे यशोगान आणि नागरिकांच्या अनुभवांमधील दरी दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत आहे. ग्राहकांच्या खिशाला बसणारा हा ‘स्मार्ट शॉक’ थांबविण्यासाठी महावितरणने केवळ दावे न करता प्रत्यक्ष उत्तर देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Tags:

'Smart' meters or a 'smart' rip-off? Consumers directly question Mahavitaran's claims.
Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

Pimpri-Chinchwad पांढरपेशी समाजसेवेचा बुरखा फाटला; लोकप्रतिनिधीच निघाला ‘ड्रग्ज माफिया’! ​हिंजवडी ड्रग्ज प्रकरणाचे ‘खंडाळा कनेक्शन’ उघड; अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचासह तिघे गजाआड

Next

सोनसाखळी चोरणाऱ्या तिघांना अटक १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
  • कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न
  • Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

CATEGORIES

  • Uncategorized (478)
  • क्राईम (264)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (908)
  • पुणे (141)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (95)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा
  • अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश
  • उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
July 31, 2026

शतक महोत्सवी मराठी साहित्य संमेलनासाठी शासनाकडून भरीव निधी मराठीच्या जागतिक प्रचारासाठी राज्य कटिबद्ध; उदय सामंत यांची घोषणा

Sumedh Chapalgaonkar

पुणे : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी उपलब्ध...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरी विशेष पोक्सो न्यायालयाचा निर्णय; २५ हजारांचा दंड, निगडी पोलीसांच्या तपासाला यश

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. ३१ (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रयत्नप्रकरणी पिंपरी-चिंचवड येथील विशेष पोक्सो न्यायालयाने...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

उद्या निगडीत वाहतुकीत बदल भक्ती-शक्ती परिसरात गर्दीची शक्यता; वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी-चिंचवड ः साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी निगडीतील भक्ती-शक्ती...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

कॅप्टन अमोल महाडिक यांचा सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जाती जातीत भांडणे पेटवण्याचा सरकारचा प्रयत्न

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज...

Read More
July 31, 2026
July 31, 2026

Pimpri-Chinchwad-पिंपरी चिंचवड लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा “मास्टर प्लॅन”

Sumedh Chapalgaonkar

– महावितरणच्या ‘प्रकाश भवन’ कार्यालयामध्ये शहरातील वीज प्रश्नांवर महत्वपूर्ण बैठक – पिंपरी-चिंचवडसह राजगुरुनगर, लोणावळ्यासाठी नवीन...

Read More
July 31, 2026
July 30, 2026

सराईत वाहन चोरट्यांना अटक; पाच वाहने जप्त

Sumedh Chapalgaonkar

चिखली पोलिसांनी दोन सराईत वाहन चोरांना अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि एक रिक्षा अशी...

Read More
July 30, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme