शिरूर जवळील करंदी येथे निवडणूक प्रचारात आयोजित बैलगाडा शर्यतीत बैलाची धडक बसून तरुणाचा दुर्दैवी मृत्य

करंदि येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली बैलगाडा शर्यत एका तरुणाच्या जीवावर बेतली असून, धावत्या बैलाला आवरताना बसलेल्या बैलाच्या जबर धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. शर्यत सुरू असताना कान्हुर मेंसाई येथील दादाभाऊ पुंडे यांचा बैल अचानक उधळला, यावेळी बैलाला पकडण्यासाठी पुढे सरसावलेल्या प्रकाश महादू फटांगडे यांना बैलाने जोरदार धडक दिली यात ते गंभीर जखमी होऊन खाली कोसळले असता त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले याप्रकरणी मृताच्या भावाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यांच्या नातेवाईकांनी गावात कोणतीही यात्रा नसताना ,केवळ निवडुकीच्या प्रचारासाठी शर्यत भरवल्याचा गंभीर आरोप केला आहे .तसेच यात्रेच्या ठिकाणी पुरेसा पोलिस बंदोबस्त तसेच रुग्ण वाहिका आणि वैद्यकीय सेवा नसल्याचा आरोपही आयोजकांवर करण्यात आला आहे, शिक्रापूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *