गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्‍हा दाखल

​पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे. लांडगेनगर येथील सद्गुरू भांड्याच्या व गॅसच्या दुकानात ही कारवाई करण्यात आली.
सिद्धार्थ सूर्यकांत भेडे (वय १८, रा. धावडेवस्ती, भोसरी, मूळगाव लातूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई राहुल बाबाजी डेरे यांनी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. ​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता अतिज्वलनशील गॅसची चढ्या दराने विक्री करीत होता. त्‍यांच्‍याकडून ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *