दिघीत गांजा पिणा-या तरुणावर गुन्हा
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – दत्तनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ गांजाचे सेवन करत बसलेल्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १३ जून रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली.
पवन श्रीधर पोळ (वय २१, रा. स्वामी समर्थनगर, दिघी, मूळ- परभणी) याच्यावर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई नितीन उत्तम लवटे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सार्वजनिक जागेत गांजा या मादक अंमली पदार्थाचे सेवन करत असताना पोलिसांना मिळून आला. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.