सिगारेटमधून गांजा ओढणारा तरुण ताब्यात

पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे सिगारेटमध्ये गांजा भरून सार्वजनिक ठिकाणी त्याचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. १३ जून रोजी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.​दीपककुमार मनोजकुमार सिंग (वय २३, रा. धावडेवस्ती, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई गजानन विष्णू आढे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.​ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपककुमार हा गार्डनच्या परिसरात सिगारेटमध्ये गांजा भरून तो ओढत असताना आणि धूर हवेत सोडत असताना सापडला. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *